दिशा पटानीला किस करत सलमाननं मोडला ‘नो किसिंग’चा नियम; सोशल मीडियावर चर्चांना उधान

मुंबई| बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटात अभिनेत्री दिशा पटाणी मुख्य भूमिकेत असून रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलमानने चित्रपटात पहिल्यांदाच किसिंग सीन देखील दिला आहे.

काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरने इंटरनेटवर धूमाकूळ घातला आहे. पण हा ट्रेलर सर्वाधिक चर्चेत आहे तो म्हणजे एका किसमुळे. सलमान खानने नो ऑनस्क्रिन किसचा आपलाच नियम मोडला आहे. फिल्ममध्ये त्याने दिशा पटानीला किस केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

या आधी सलमानने कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन दिले नव्हते. त्यामुळे या चित्रपटासाठी ‘भाईजान’ने आपला ‘नो किसिंग’ नियम मोडल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

एका युझरने प्रतिक्रिया देताना लिहिलं, ‘भाईजान तुम्हीदेखील बिघडलात.’ तर दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘सलमान भाई, तुम्ही तुमच्या चाहत्यांना दिलेलं वचन तोडलं.’ एका चाहत्याने लिहिलं, ‘आपल्या 32 वर्षांच्या करिअरमध्ये भाईने पहिल्यांदाच किसिंग सीन दिला.’ इतकं असूनही सलमानच्या चाहत्यांनी या ट्रेलरचं स्वागत केलं आहे.

ट्रेलरमध्ये मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी असलेला राधे म्हणजेच भाईजान सलमान मुंबईतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना दिसणार आहे.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी 2019 मध्ये करण्यात आली होती. 2020 मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

थिएटर व्यतिरिक्त प्रेक्षक ‘झी 5’वर, व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील आणि प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जातील.

सलमान खानचा ‘राधे’ बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’शी स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे. ‘राधे’ हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होत आहे आणि ‘सत्यमेव जयते 2’ देखील त्याच दिवशी रिलीज होईल. यापूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. पडद्यावर कोणता चित्रपट रसिकांचे मन जिंकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

महत्वाच्या बातम्या – 

स्वामींच्या कृपेनं ‘या’ 5 राशींच्या लोकांचा वाई काळ संपणार,…

बाॅलिवूडला आणखी एक मोठा धक्का! ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार…

शरीरातील ॲाक्सिजनची पातळी वाढवायची असेल तर ‘या’ 6 गोष्टी…

कोरोना काळात वाफ कशी घ्यावी?, 5 महत्त्वाचे नियम, नाहीतर…

सेक्स एज्युकेशन विषयी माहिती देणाऱ्या ‘या’…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy