Top news महाराष्ट्र मुंबई

‘जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज…’; आयआयटीतील तज्ज्ञांचा मोठा दावा

corona 1 1 e1640885680626
Photo Credit - Pixabay

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशात आयआयटी कानपूरचे प्रोफेसर आणि गणिततज्ञ मनिंद अग्रवाल यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज कोरोनाचे 8 लाखाहून अधिक रुग्ण पाहायला मिळतील. त्यांनी सांगितलं की पुढच्या 3-4 दिवसात चित्र स्पष्ट होईल. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.

दिल्ली आणि मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत ही लाट आपला सर्वोच्च बिंदू गाठेल. दिल्लीमध्ये दररोज 50 ते 60 हजार केस पाहायला मिळतील तर मुंबईत 30 हजार प्रकरणं समोर येतील, असंही मनिंद अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

कोणतीही महामारी पहिल्यांदा ज्या वेगाने पसरते, त्याच वेगाने त्यात घटही होते. यामुळे तिसरी लाट शिगेवर जाताच रुग्णसंख्येत मोठी घट होताना पाहायला मिळेल. दक्षिण आफ्रिकेत हेच पाहायला मिळालं आहे, असं ते म्हणालेत.

दरम्यान,देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार झपाट्यानं होत आहे. अनेक राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 24 तासांत तिपटीहून अधिक वाढली आहे.

शुक्रवारी राज्यात एकूण 62 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर होते. तर, शनिवारी हा आकडा वाढून 226 झाला. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Election) पंजाबमध्ये कोरोना विषाणूच्या (Corona Cases in Punjab) प्रसारामुळं परिस्थिती आणखी बिघडत आहे.

पंजाबमध्ये 1 जानेवारी रोजी 23 रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर दाखल करण्यात आलं होतं. 1 जानेवारी रोजी राज्यात 332 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. शुक्रवारी राज्यात 2 हजार 901 कोरोना रुग्ण आढळले. शनिवारी ही संख्या 3 हजार 643 वर पोहोचली. शुक्रवारी लेव्हल 3 सपोर्टवर 20 रुग्ण होते. शनिवारी त्यांची संख्या जवळजवळ तिपटीनं वाढून 55 झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

हिंदूचं घर जळालं तर मुस्लिमाचं घर थोडीच सुरक्षित राहील- योगी आदित्यनाथ 

Skin Care | दुधाचे हे फेसपॅक वापरा अन् आणि मिळवा तजेलदार त्वचा! 

“आम्हाला कुणी विचारत नाही, घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय” 

“सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेलाय, राज्यात सगळा सत्यानाश सुरुय” 

‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 50 लाख