मुंबई : राज्यपाल ची. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर त्यांना आज राज्य सरकारतर्फे राजभवनावर भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप देत त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या पत्नी विनोदा यांनाही यावेळी पुष्पगुच्छ देण्यात आला. भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रिडामंत्री आशीष शेलार, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, पोलीस आयुक्त संजय बर्वे, प्रधान सचिव राजशिष्टाचार नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर या निरोप सोहळ्याला उपस्थित होते.
राज्यपाल विद्यासागर राव यांनी देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्रीमंडळ सदस्य तसेच राज्यातील जनतेचे त्यांना मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता राजभवन येथे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झालेले राज्याचे नवे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शपथविधी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
अमित शहा अहमदाबादच्या रूग्णालयात अॅडमिट! https://t.co/Ectk5YWiJN #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
संजय बांगरच्या संतापाचा स्फोट; सिलेक्टरच्या रुममध्ये घुसून दमदाटी – https://t.co/slsr4IBX5z @BCCI @ICC @ImSanjayBangar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
चंद्रकांत पाटलांनी घेतली पूरग्रस्त भागातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी – https://t.co/ZfUrTRZjki @ChDadaPatil #flooding
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019