मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महिना लोटला, तरी अद्याप त्यांचे खातेवाटप झाले नाही. त्यामुळे विरोधक त्यांना चांगलेच धारेवर धरत आहेत.
पण आता विरोधकांची तोंडे बंद होणार आहेत. कारण एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) खातेवाटपासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी केसरकरांनी रविवार पर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होईल अशी माहिती दिली होती.
आता केसरकरांनी खातेवाटपाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ज्याप्रमाणे मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील त्याप्रमाणे विस्तार होईल. मला माझे वरिष्ठ जेवढी माहिती देतात, मी तेवढीच सांगतो, असे केसरकर म्हणाले.
केसरकर म्हणाले, मी कोणताही निर्णय घेत नाही. येत्या चार दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे केसरकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे यादी नक्की झाली अशी बातमी आहे.
देवेंद्र फडणवीस आपली इतर सर्व कामे टाकून दिल्लीला खातेवाटपाच्या यादीसाठीच गेले आहेत, असे वृत्त आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे त्यांची प्रकृती ठीक नाही.
एकनाथ शिंदे सध्या मुंबईत त्यांच्या निवसास्थानी आराम करत आहेत. त्यांना डॉक्टरांनी सक्त आरामाचा सल्ला दिला आहे.
खातेवाटपाची संभाव्य यादी समोर आल्याचे वृत्त आहे. त्यात भाजपचे सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रविंद्र च्व्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबन लोणीकर, यांना मंत्रीपदे मिळणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या गोटातील शंभूराज देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्या नावांची वर्णी लागली आहे.
महत्वाच्या बातम्या –
मंगळसूत्र गळ्यात असलं की नवऱ्याने गळा पकडल्यासारखं वाटतं त्यामुळे मी….- अमृता फडणवीस
पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला महत्त्वाची सूचना!
‘आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही’, हेराल्ड हाऊससंबंधी कारवाईनंतर राहुल गांधी आक्रमक
‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”