मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, वाचा कुणाला संधी मिळणार

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे साभांळून आता महिना लोटला, तरी त्यांच्या मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झाला नाही. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ विरोधी पक्ष त्यांना धारेवर धरत होते.

पण आता विरोधी पक्षांना शांत बसावे लागणार आहे. सततच्या दिल्ली दौऱ्यांच्याअंती आता भाजप आणि शिंदे गटात संधान झाले आहे. त्यांनी मंत्र्यांची यादी तयार केली असून, उद्या खातेवाटप होण्याची दाट शक्यता आहे.

मंत्रिपदासाठी शिंदे यांच्या गटातील चार आणि भाजपच्या गटातील चार आमदारांना संधी मिळणार आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मंत्रिपद मिळणार आहे.

तर शिंदे यांच्या गोटातील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उदय सामंत (Uday Samant), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) आणि दादा भुसे (Dada Bhuse) यांना मंत्री करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अद्याप त्यांची कोणत्या खात्यावर वर्णी लागणार आहे? याची माहिती कळू शकली नाही.

भाजपच्या गटातील वरील चार आमदारांना लगोलग मुंबईत बोलाविण्यात आले आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा या आमदारांना फोन गेला असून त्यांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे शिंदे गटाच्या पाच आमदारांनादेखील मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांना शासकीय निवासस्थानी थांबण्यास सांगितले आहे. भाजप आणि शिंदे युतीच्या शिल्पकारांना देखील संधी मिळण्याचे संकेत आहेत.

संजय कुटे (Sanjay Kute), बंटी भांगडिया (Bunty Bhangadiya), रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या नावाची देखील चर्चा मंत्रिपदासाठी आहे. पहिल्या टप्प्यात वीस ते पंचवीस आमदारांचा शपथविधी होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिपदे देखील लवकर वाटण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रक्रुती सुधारली असून, ते नांदेड दौऱ्यासाठी निघाले आहेत. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न

“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”