मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत आज निर्णय?

मुंबई | राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. खातेवाटपावर चर्चेसाठी काँग्रेस नेते दिल्लीमध्ये गेले आहेत.

काँग्रेस नेते मुंबईत परतल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत महा विकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी दोन-दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.  काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

महत्वाच्या बातम्या-