आज भारत बंदची हाक, कसं असेल स्वरुप? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | देशभरातील मजूर आणि व्यापार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. जीएसटीच्या तरतूदींविरोधात हा भारत  बंद पुकारण्यात आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपाून दिल्लीच्या वेशीवर आं.दोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने देखील या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

आं.दोलनातील शेतकऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज जवळपास 1500 ठिकाणी नि.षेध आं.दोलन करण्यात येणार आहेत. या आं.दोलनाला आता सुरुवात झाली आहे.

तसेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनने देखील आजच भारत बंदची हाक दिली आहे. वस्तू आणि सेवा कराच्या तरतुदींमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी ही भारत बंदची हाक दिली आहे.

जीएसटी परिषदेने आपल्या हितासाठी जीएसटीला वि.कृत रुप दिल्याचा आ.रोप कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी केला आहे. राज्य सरकारांना केवळ स्वार्थ साधायचा आहे. त्यांना कर प्रणालीची कोणतीच काळजी नाही. वारंवार मुद्दे उपस्थित करुन देखील दखल घेतली नाही. यामुळे भारत बंदचं नियोजन करण्यात आलं आहे, असंही प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटलं आहे.

भारत बंदमुळे कोणत्या गोष्टी बंद असतील?

  1. आज देशभरातील बहुतेक बाजारपेठा बंद राहतील. कारण 40 हजारापेक्षा जास्त व्यापारी संघटना भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.
  2. देशभरातील अनेक भागांंमध्ये वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. All India  Transport Welfare Association ने वाहतूक कंपन्यांना सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत गाड्या पार्क करण्याचं आवाहान केलं आहे.
  3. GST तील तरतुदी दूर करण्यासाठी कोणताही व्यापारी आज ऑनलाईन पोर्टलवर लॉग ईन करु शकत नाही.
  4. चार्टर्ड अकाऊंटस आणि टॅक्स अ‍ॅडव्होकेट संघटना देखील यामध्ये सहभागी होणार आहेत.
  5. बुकिंग आणि बिलासंदर्भात सर्व व्यवहार बंद राहतील.
  6. महिला उद्योगगट, फेरीवाले आणि अन्य लहान व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

भारत बंदचा कोणत्या सेवांवर परिणाम होणार नाही.

  1. अत्यावश्यक सेवा, मेडीकल, दूध आणि भाज्यांचा पुरवठा सुरळीत राहिल.
  2. बॅंकिंग सेवेवरही याचा कोणता परिणाम होणार नाही.

 

महत्वाच्या बातम्या –

1 मार्चपासून शाळा बंद? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – देवेंद्र फडणवीस