Health| उन्हाळ्यात जास्त पाणी पिणेही ठरु शकतं घातक?, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | यंदाचा उन्हाळा गतवर्षीपेक्षा जास्त कडक असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसत आहे.

ल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे त्यातच आता भारतीय हवामान विभागाने उष्णतेमध्ये तीव्र वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

कडक उन्हाळ्यामुळे डिहाड्रेशन होत असलेलं पहायला मिळतं. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी पिण्यासाठी सांगितलं जातं. मात्र जास्त पाणी पिणंही शरिरासाठी घातक ठरु शकतं.

शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पिता तेव्हा ओव्हरहायड्रेशन होते. यामुळे तुमच्या शरीरात सोडियम आणि इतर आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होतं.

गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्यामुळे हायपोनॅट्रेमिया आणि पाणी विषबाधा सारख्या परिस्थिती उद्भवतात.

सोडियम तुमच्या पेशींमधील आणि बाहेरील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. जेव्हा ते कमी होते, तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागतात.

डोकेदुखी, भ्रम, मळमळ, अस्वस्थता, थकवा, स्नायू आवळले जाणे, या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे पाणीही नियंत्रणात प्यावं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “बाळासाहेब ठाकरे भोळे होते, पण मी….”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

  मास्क सक्तीविषयी राजेश टोपेंचा गंभीर इशारा, म्हणाले…

“अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो” 

“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” 

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत”