महाराष्ट्र Top news मुंबई

प्रचंड मेहनत करुनही करिअरमध्ये यश मिळत नाहीये?, मग करा हे उपाय

Tensed Man e1638410592108
Photo Credit- Pixabay

मुंबई | तुमच्या नोकरीत स्थिर राहण्यासाठी आणि तुम्ही करिअरच्या चांगल्या संधीच्या शोधात असाल, तर तुम्ही दररोज किमान 31 वेळा गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करावा.

भगवान गणेश, ज्याला अडथळ्यांचा नाश करणारा म्हणून देखील ओळखले जाते. ज्यांना नोकरी मिळण्यात सतत विलंब आणि अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी त्याच्या बीज मंत्राचा पाठ करणं अत्यंत फायदेशीर ठरेल. या ज्योतिषीय उपायाने व्यक्तीचे करिअर स्थिर होण्यासही मदत होईल.

जर एखाद्याला बीज मंत्र माहित नसेल तर ‘ओम गण गणपतये नमः’ या मंत्राचाही जप करता येतो कारण तो देखील तितकाच फायदेशीर आहे.

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणखी एक प्रभावी ज्योतिषीय उपाय म्हणजे एक लिंबू घेऊन त्यामध्ये चार लवंगा टोचणे. आता ते उजव्या हातात घेऊन भक्तीभावाने “ओम श्री हनुमंते नमः” या मंत्राचा 21 वेळा जप करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लिंबू फेकू नका तर खिशात किंवा पर्समध्ये ठेवा.

सर्वात सोपा ज्योतिषीय उपाय म्हणजे उकडलेले तांदूळ कावळ्यांना देणे. या उपायाने शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावांना शांत करण्यात मदत होईल. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तत्त्वांनुसार, शनि मूळच्या व्यवसायावर आणि करिअरवर राज्य करतो असे म्हटले जाते आणि कावळा शनि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याचे प्रतीक आहे.

दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात गूळ टाकून सूर्याला जल अर्पण करावं. यशस्वी करिअर आणि नोकरीसाठी हे सर्वात सामान्य आणि प्रभावी ज्योतिषीय उपायांपैकी एक मानलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या- 

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

मोठी बातमी! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

kunal Kamra म्हणतो, “मी एक कोरोना व्हायरस आहे म्हणून…”