नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी

मुंबई |  देशात मोठ्या प्रमाणावर सध्या बेरोजगारी वाढत असल्याचं अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. परिणामी तांत्रिक शिक्षणावर सध्या भर देण्यात येत आहे.

आटीआय, इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रात आजही नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याचं अनेकदा वाचण्यात आलं असेल. मात्र, काहींना जाॅबसाठी लागणारी पात्रता कमी असल्याने जाॅब मिळणं अवघड जातं.

सध्या सर्वात जास्त जर कोणत्या क्षेत्राचा बोलबाला चालू असेल तर तो फक्त IT क्षेत्राचा आहे. कारण आयटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत.

फ्रान्सची आयटी कंपनी कॅपजेमिनी भारतात बंपर भरती करणार आहे. भविष्यातील वाटचालीसाठी भारतीय कलात्मक ज्ञानाचा फायदा कंपनी करून घेणार आहे.

देशात कॅपजेमिनी 60 हजार जणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. डिजिटल माध्यमांचा आणि उपायांचा विचार करता ही भरती केली जाणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

कंपनीचे सीईओ यश्विन यार्डी यांनी कंपनीकडून करण्यात येणाऱ्या भरतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कॅपजेमिनीनं गतवर्षी एरिक्सनसोबत मिळून मोठी घोषणा केली होती.

कॅपजेमिनीनं भारतात 5जी लॅब लाॅंन्च केली होती. कॅपजेमिनीला भारतात मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता भारतात मेगा भरती करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.

दरम्यान, आम्ही भारतीय महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये देखील जात आहोत, असं यश्विन यार्डी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता खूप मोठ्या कालावधीनंतर मेगाभरती होणार असल्याने विद्यार्थी देखील तयारीला लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय

 सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा

अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल 

बालात्काराचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्याचे खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल!