पुणे महाराष्ट्र

अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण : अखेर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल

जुन्नर | निराधार-मनोरुग्णांची संस्था चालवणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून मारहाण केली, तसेच बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप अक्षय बोऱ्हाडेने केला होता. याप्रकरणी त्याने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली होती.

अक्षयच्या आरोपानंतर विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षयला पाठिंबा देत त्याला मारहाण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.

आज अनेक तरुण-तरुणींनी जुन्नर पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तसेच सत्यजीत शेरकर यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी लावून धरली होती. अखेर आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

-सरकार भूमिका घेईल असं वाटत नाही, आता नातेवाईक मित्रमंडळींना भेटायला सुरू करा- आंबेडकर

-लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर

-शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून मी निराश झालो- देवेंद्र फडणवीस

-पॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे