पुणे | दोन दिवसांपूर्वी पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पुणे दौरा होता. त्याच वेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची देखील कात्रज भागात शिवसंवाद यात्रेची सभा होती.
यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे देखील पुण्यात आले होते. त्यावेळी रात्री ते कात्रज चौक परिसरातून जात असताना त्यांच्या गाडीच्या ताफ्यांवर हल्ला झाला होता.
यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर चपला, पाण्याच्या बाटल्या आणि दगडांचा वर्षाव केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आणि गाडीतील त्यांचे सहकारी जखमी झाले होते.
यावर उदय सामंत यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) यांच्यासह चार जणांना अटक केली होती.
या प्रकरणावर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भाष्य केले होते. हल्ला करणारे शिवसेनेचे (Shivsena) लोक नव्हते, ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कार्यकर्ते होते, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्ष आरोप केला होता. त्यामुळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गोपीचंद पडळकर हे बेताल आणि बेभरोशाचे आरोप करत आहेत. त्यांच्या या वागणुकीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करत त्याच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे पोलिसांना सांगितले असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
ईडीच्या हाती नवीन पुरावे, संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?
राऊत दांपत्याची एकत्र चौकशी होणार, वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स
मंगळसूत्र गळ्यात असलं की नवऱ्याने गळा पकडल्यासारखं वाटतं त्यामुळे मी….- अमृता फडणवीस
पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला महत्त्वाची सूचना!