नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 सप्टेंबर रोजी आदेश दिले जातील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यांनंतर पी. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी द्या, अशी मागणी सीबीआयने आज सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी देऊन तिहार तुरुंगात पाठवा, अशी मागणी करत सीबीआयने चिदंबरम यांची कोठडी नाकारली आहे. मात्र सीबीआयच्या या मागणीला नकार देत कोर्टाने चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
चिदंबरम यांनी सोमवारी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायमूर्ती आर बानुमती आणि न्यायमूर्ती आर एस बोपन्ना यांच्या द्वीसदस्यीय खंडपीठाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणात पुढील गुरूवारपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, चिदंबरम यांना सीबीआयने 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरुन नाट्यमयरित्या अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या-
माझ्यावर प्रेम करणारी इतकी ‘येडी’ असताना मला ‘ईडी’ची भिती कशाला- उदयनराजे भोसले – https://t.co/TYw0XQcsGg @Chh_Udayanraje
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019
त्याला वाटतं तो खूप मोठा क्रिकेटर आहे; अटकेच्या वॉरंटनंतर शमीच्या पत्नीची प्रतिक्रिया – https://t.co/iK33xcjpYR @MdShami11
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019
ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू भारतीय तरूणीच्या प्रेमात! https://t.co/4PeYn3sFfK #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019