गिरीश महाजनांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला! फडणवीस म्हणाले…

मुंबई | भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सीबीआयने (Central Bureau of Investigation) गुन्हा दाखल केल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाष्य केले आहे. फडणवीसांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी त्यावर भाष्य केले आहे.

गिरीश महाजनांवर सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच मागील काळात गिरीश महाजनांवर सीआयडीकडे (CID) दाखल केलेला गुन्हा सीबीआयकडे देण्यात आला, असे देखील फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. मागील काळात सीबीआयकडे जो गुन्हा दाखल झालेला होता, तोच सीबीआयला हस्तांतरीत केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

हे सर्व प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत असून, त्यामुळे गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र असणार आहे, असे देखील  फडणवीस म्हणाले.

आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. या सर्व प्रकरणात माझ्याकडे एक पेनड्राईव्ह होता. तो मी सीबीआयला दिला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

कोणत्या अधिकारात तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात? न्यायालयाने शिंदे यांच्या वकिलाला फटकारले

“…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार” – घटनातज्ज्ञ उल्हास बापट

संजय राऊत यांची आज सुनावणी पार पडली; महत्वाची माहिती समोर

‘राजस्थानातील 90 आमदारांच्या बंडावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मोठा निर्णय’

“… म्हणून त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कारवाईचा आरोप नक्की करावा”; सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद