दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयची मोठी कारवाई

दिल्ली | आम आदमी पक्षाचे (AAP) दिल्लीचे उपमुख्यमंंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. सीबीआयकडून सध्या एकाच वेळी 20 ठिकाणी छापेमारी केली गेली आहे.

या छापेमारीबद्दल सिसोदिया यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. सीबीआयचे (CBI) आमच्या घरी स्वागत आहे. चौकशी दरम्यान आम्ही त्यांनी पूर्ण सहकार्य करु, जेणे करुन सत्य लवकरच समोर येईल, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस केल्या आहेत. परंतु त्यातून काहीही निषपन्न झालेले नाही. तसेच या छापेमारीतून देखील ते काहीही सिद्ध करु शकणार नाहीत, असे मनीष सिसोदिया म्हणाले.

आम्ही मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहोत. आणि त्यातून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे देखील सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

आम्ही कट्टर ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तरी देखील आमच्या या उदात्त कामात अडथळे आणले जात आहेत, म्हणून आपला देश पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकत नाही, असे सिसोदिया म्हणाले.

दिल्ली सरकारच्या शिक्षण खात्यात घोटाळा झाल्याचा सीबीआयला संशय आहे. दिल्लीतील शाळांमध्ये 2000 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. त्यातून ही छापेमारी केली गेली आहे.

या चौकशी आणि छापेमारीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी देखील ट्विट केले आहे. दिल्लीतील शिक्षण व्यवस्था आणि आरोग्याच्या प्रगतीबाबत जगभरात चर्चा होत आहे, ते काही लोकांना बघवत नाही.

तसेच दिल्लीची वाह, वाह या लोकांना सहन होत नाही. ही प्रगती ही प्रशंसा त्यांना रोखायची आहे. त्यामुळे ते दिल्लीच्या मंत्र्यांच्या घरावर छापेमारी करत आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

“शेतकरी विरुद्ध मोदी सरकार संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता”

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर देशभरात संताप व्यक्त!

संजय राऊतांबाबत ईडीच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड

“राष्ट्रवादीतील या पाच बड्या नेत्यांची चौकशी करायची आहे”

मेहबुबा मुफ्तींचे मोंदीवर गंभीर आरोप; म्हणाल्या, आमच्या राज्याला…