Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

रोहन रॉय सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार? सीबीआयची मोठी कारवाई!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी गेल्या कित्येक महिन्यांपासून सीबीआय शोध घेत आहे. मात्र, तरीही दिवसेंदिवस सुशांत प्रकरणातील गुंता वाढतंच चालला आहे. सुशांतच्या मृ.त्यूला जवळपास तीन महिने उलटून गेले तरी अनेकजण याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे करत आहेत.

सुशांतच्या मृ.त्यूच्या काही दिवस अगोदरच सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सॅलीयनचा मृ.त्यू झाला होता. सुरुवातीपासून दिशाच्या मृ.त्यूचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. यामुळे सीबीआय सुशांतच्या मृ.त्यूचा दिशाच्या मृ.त्यूशी संबंध आहे का याचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे.

सीबीआयनं सुशांतच्या मृ.त्युचा तपास दिशाच्या अँगलनं सुरू केला आहे. याच तपासासाठी सीबीआय अधिकाऱ्यांनी दिशाचा कथित प्रियकर रोहन रॉय याच्या घरी धाड टाकली आहे. सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यू प्रकरणी शोध घेण्यासाठी सीबीआयनं दिशाच्या जवळच्या लोकांची चौकशी केली आहे.

सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांची टीम बुधवारी रात्री रोहन रॉयच्या घरी पोहचली होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनीही दिशा प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. दिशाच्या मृ.त्यूच्या दिवशी दिशा एका पार्टीमध्ये गेली होती. या पार्टीमध्ये काहितरी असं घडलं होतं ज्यामुळं दिशाचा मृ.त्यू झाला आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तसेच दिशानं आ.त्मह.त्या केली नसून तिला मारण्यात आलं आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

त्या दिवशी दिशाला काही दिग्गज लोकांनी पार्टीमध्ये बोलावलं होतं. दिशाला या पार्टीमध्ये जायचं नव्हतं मात्र ती तिच्या मनाविरुद्ध पार्टीला गेली होती. या पार्टीमध्ये दिशाबरोबर खूप वा.ईट कृत्य घडलं होतं.

जेव्हा दिशा पार्टीवरून मलाडला घरी निघाली होती त्यावेळी दिशानं सुशांतला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर सुशांतनं ही सर्व माहिती रियाला दिली. रियानं पुन्हा पार्टीत उपस्थित असणाऱ्या लोकांना सुशांतला सर्व समजल्याचं सांगितलं, असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

तसेच दिशा जेव्हा तिच्या मलाड मधल्या घरी पोहचली त्यावेळी सहाजिकच काही लोक दिशाच्या घरी अगोदरच उपस्थित होते. यावेळी दिशाला कोणीतरी धक्का दिला किंवा यावेळी तिच्याबर असं काही घडलं ज्यामुळं तिचा मृ.त्यू झाला, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सोडलं मौन म्हणाले…

धक्कादायक! सुशांत प्रकरणी ‘ते’ वृत्त चुकीचे; सीबीआयने दिले स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणारी पायल ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

फाऊल प्लेचा निकाल देऊन सीबीआय सुशांत प्रकरण बंद करणार?

सुशांतच्या बहिणीने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल! सुशांतचे चाहते झाले हैराण 15/10/2020 3:56 PM