मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपवलं आहे. सुशांत प्रकरणी अतिशय वेगानं तपास करत 13 दिवसांच्या तपासानंतर सुशांतनं आ.त्मह.त्या केल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. सीबीआय टीम आता सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या बाजूने तपास करत आहे.
सीबीआयची टीम पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतच्या घरी दाखल झाली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास सीबीआय टीम सुशांतच्या वांद्रे येथील कार्टर रोडवरील माउंट ब्लॅक इमारतीतील सुशांतच्या घरी दाखल झाली आहे. यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
सुशांत राहत होता त्या ईमारतीतील लोकांची चौकशी केली जाणार आहे. इमारतीतील लोकांच्या चौकशीमुळे सुशांतप्रकरणी महत्वाची माहिती मिळू शकते. तसेच सुशांतच्या आ.त्म्हत्ये.च पुन्हा एकदा नाट्य रुपांतर केलं जाणार आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांची टीम यापूर्वी दोन वेळा सुशांतच्या वांद्रे येथील घरी दाखल झाली होती. आज सीबीआय टीम तिसऱ्यावेळी सुशांतच्या घरी दाखल झाली आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी यापूर्वी सुशांतच्या इमारतीतील सर्व सीसीटीव्ही रेकोर्ड चेक केले होते. तसेच सुशांतच्या आ.त्म्ह.त्येचं नाट्य रूपांतरही सीबीआयद्वारे करण्यात आलं होतं.
दरम्यान, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तसेच रियाचा भाऊ शौविक यांच्या मोबाईलमध्ये सीबीआयला ड्र.ग्ज.विषयीचं काही चॅट आढळलं होतं. यामुळे एनसीबीच्या एका टीमनं शुक्रवारी सकाळी रियाच्या घरावर छापा टाकला होता. तसेच एनसीबीच्या दुसऱ्या टीमनं रियाच्या कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरावर छापा टाकत सॅम्युअलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
एनसीबीच्या टीमनं एकसाथ दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू ठेवलं होतं. तपासादरम्यान एनसीबीला शौविक आणि सॅम्युअल विरोधी पुरावे मिळाल्यानं काल दोघांना अ.टक केलं आहे. आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान सॅम्युअल आणि शौविकला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. सॅम्युअल आणि शौविकच्या चौकशीसाठी एनसीबी न्यायालयाला कोठडीची मागणी करणार आहे. तसेच या दोघांसोबतच रियालाही अट.क केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून नेहमी मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही”
सुशांतप्रकरणी मोठी कारवाई ! बंगळुरूमधून ‘या’ बड्या अभिनेत्रीसह दोघांना अ.टक
सुशांतप्रकरणी रियाचा भाऊ शौविक सोबतच सॅम्युअल मिरांडाही गजाआड, रिया चक्रवर्तीच्याही अ.टकेची शक्यता
ऐकावं ते नवलंच! 9 तास झोपा आणि लाखो रुपये कमवा; भारतीय कंपनी देतेय आगळीवेगळी संधी
सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!