CBSE बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार- रमेश पोखरियाल

नवी दिल्ली | CBSC बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या ज्या परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या या परीक्षा आता 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहेत अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

रमेश पोखरियाल यांनी ट्विटवर एक व्हिडीओ ट्विट करत ही माहिती दिली आहे. सीबीएससी बोर्ड 10 आणि 12 वीच्या उर्वरित परीक्षा घेणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकाडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहेत.

लॉकडाउनमुळे स्थगित झालेल्या जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षेचीही घोषणा केली होती. 23 ऑगस्ट, 2020 रोजी ही परीक्षा घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

-मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली!

-‘यंदा फीवाढ करु नका’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

-“दादांनी प्राॅमिस मोडलं”, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात आलं पाणी

-“महाराष्ट्रावरचा अन्याय तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही राजकारण करण्यास नालायक आहात”

-लॉकडाउनमध्ये दगडी चाळीत ‘या’ अभिनेत्यासोबत पार पडला अरूण गवळीच्या लेकीचा लग्नसोहळा