चेन्नई | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. तामिळनाडूमध्ये कन्नरमध्ये झालेल्या लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात बिपीन रावत यांचं आज दुर्वैवी निधन झालं.
या अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालं आहे. लष्करी हेलिकॉप्टरच्या झालेल्या या भीषण दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी ६ जण हे लष्करी अधिकारी होते. तामिळनाडूमधील खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं प्राथमिकरीत्या सांगितलं जात आहे.
दरम्यान, डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं.
शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या-
बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा
“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”
‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड