महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यात केंद्राची एंट्री; घेतला मोठा निर्णय

मुंबई | शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनांनंतर केंद्र सरकारने शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला काळं फासलं आहे.

कुटुंबीयांना धोका असल्याची तक्रार काही आमदारांनी केली होती. यानंतर केंद्राने आमदारांच्या कुटुंबीयांना आज संध्याकाळपासून सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 38 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. गुवाहाटीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमदार तळ ठोकून आहे. पण, महाराष्ट्रातून शिंदे गटात दाखल झालेले अनेक आमदार हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर 

‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात 

“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”