केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; भरघोस पगारवाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली | कोरोनानं सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. त्यातही उद्योगधंदे आणि इतर सर्वकाही बंद असण्यानं सरकारच्या तिजोरीवर परिणाम झाला होता. याचा फटका थेट नोकरदारांना बसल्यानं आता त्यांच्यासाठी एक चांगला निर्णय होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याबाबत सरकार सध्या सकारात्मक विचार करत आहे. असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

सरकारने फिरमेंट फॅक्टर वाढवण्यावर विचार केला आहे. परिणामी सरकार सध्या कशापद्धतीनं पगारवाढ करता येईल याचा विचार करत आहे. हा विचार जर अमलात आला तर भरघोस पगारवाढ होणार आहे.

एआयसीपीआयची आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीनूसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि घरभत्ता देण्यात येतो. परिणामी महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ होणार आहे.

सध्या एआयसीपीआय निर्देशांक 125.7 इतका झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एकूण महागाई भत्ता 33 टक्के असेल. सध्या त्यांना 31 टक्के डीए मिळत आहे.

फिरमेंट फॅक्टर हा नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचं मोठं कारण ठरू शकतो. सध्या फिरमेंट फॅक्टर 2.57 वर आहे. तो फॅक्टर 3.68 करावा अशी मागणी केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून करत आहेत.

26 जानेवारीपूर्वी पगारवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 26 तारखेच्या अगोदर कर्माचारी संघटनेचे प्रतिनिधी सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. परिणामी काहीतरी सकरात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

किमान मुळ वेतन जे आहे त्यावर फिरमेंट फॅक्टरचा आकडा वाढवला गेला तर पगार थेट दुप्पट होणार आहे. समजा एखाद्याचा पगार 26 हजार आहे. तर त्यांचा पगार थेट 95 हजार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, फिरमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पगारवाढ होणार आहे. परिणामी सध्या कर्मचारी सरकारच्या निर्णयाची वाट बघत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

 बापरे! कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर

 मेट्रोबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले…

 मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!

 कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ