केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट

नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. एका अहवालानुसार, कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या थकित महागाई भत्त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या होणाऱ्या आगामी बैठकीत थकित महागाई भत्त्याच्या प्रलंबित मुद्द्याचा निपटारा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा महागाई भत्त्यातील फरक मिळाल्यास मोठा आर्थिक लाभ ठरणार आहे.

कर्मचारी गटाने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम एक वेळेस अदा करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालयासोबत सध्या चर्चा सुरु आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. आतापर्यंत 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 5580 रुपये वेतनात जमा होत होते.

डीए रकमेत 34 टक्के वाढीमुळे मूळ वेतनात 6120 रुपयांची प्रति महिना वाढ होईल. प्रति महिना 540 रुपयांची वाढ होईल. वार्षिक आधारावर विचार करता 6480 रुपयांची वाढ अपेक्षित असेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये आहे. 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 17,639 रुपयांचा डीए प्रति महिना प्राप्त होईल. जर 34 टक्क्यांनुसार विचार केल्यास प्रतिमाह 19346 रुपये वाढ दिसून येईल. वार्षिक आधारावर कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20,484 रुपयांची वाढ अपेक्षित असेल.

दरम्यान, थकित महागाई भत्त्यासोबत नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे

महत्त्वाच्या बातम्या-

“…तर आम्ही 20 कोटी मुसलमान लढू”; नसिरूद्दीन शहांचं वक्तव्य चर्चेत 

राज्यपाल कोश्यारी म्हणतात, “महात्मा गांधींच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी…”

“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”

दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध