लिंगायत धर्माबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

मुंंबई : लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी डिसेंबर 2018 मध्ये लोकसभेमध्ये नियम 377 नुसार लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

राजू शेट्टींना गृह विभागातील सहसचिव एस.सी.एल. दास यांनी पत्र लिहून केंद्र सरकारचं याबाबत उत्तर कळवलं आहे. केंद्र सरकारने लिंगायत धर्मास स्वतंत्र दर्जा देण्यास असर्मथता दर्शवली आहे. लिंगायत आणि विरशैव हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचं यामध्ये म्हटंल आहे.

लिंगायत धर्माचा स्वतंत्र ध्वज, धर्मग्रंथ असून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आहे. त्यामुळे लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी देशभरातील लिंगायत धर्म एकवटून रस्त्यावर उतरला आहे.

केंद्र सरकारची ही भुमिका लिंगायत समाजावर अन्याय करणारी असल्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. यापुढे लिंगायत समाज कोणतं पाऊल उचलणार याची सर्वत्र उत्सुकता आहे.