नवी दिल्ली | रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकतंच सरकारने एक मोठी घोषणा केलीये. PMGKY अंतर्गत, मोफत रेशन वितरण मोहीम मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला 10 किलो मोफत रेशन मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार होती. परंतु राज्य सरकारने ही मुदत होळीपर्यंत वाढवली तसेच मोफत रेशन वितरणाची घोषणा केली आहे.
गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना महिन्यातून दोनदा तांदूळ आणि गहू मोफत मिळणार आहे. तसेच खाद्यतेल, मीठ आणि डाळी मोफत दिल्या जात आहेत.
डिसेंबरपासून शिधापत्रिका धारकांना आणि पात्र कुटुंबीयांना दुप्पट रेशन दिलं जात आहे. अन्न योजनेंतर्गत पात्र घरगुती कार्डधारकांची 134177983 युनिट्स आहेत.
राज्याच्या संमतीच्या आधारे केंद्र सरकारने तीन आठवड्यांत सामुदायिक स्वयंपाक घर योजनेचे मॉडेल तयार करावं, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.
दरम्यान, सामुदायिक स्वयंपाकघर समुदायाद्वारे समाजाच्या कल्याणासाठी चालवलं जाईल, अस मंत्र्यांनी बैठकीत म्हटलं आहे. PMGKY मुळे उत्तर प्रदेशातील 15 कोटीहून अधिक शिधापत्रिकाधारकांना दुप्पट रेशन मोफत मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
…म्हणून साई पल्लवीने धुडकावली 2 कोटी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर!
‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं
डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा!
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय