देशात कोरोनाचा कहर, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…

नवी दिल्ली | देशात कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र सरकारनं कठोर पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे. कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

केंद्र सरकारने त्यांच्या विभागातील अंडर सेक्रेटरी स्तरापासून ते कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर 50 टक्क्यांची मर्यादा आणली आहे. कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह इतर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना केंद्र सरकारडून देण्यात आल्या आहेत. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश देखील केंद्राकडून देण्यात आले आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांचे घर कन्टेंन्मेंट झोनमध्ये असेल त्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. शक्य असेल तेव्हा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारचे अधिकारी व कर्मचारी सकाळी 9 ते 5.30 आणि सकाळी 10 ते 6.30 या दोन वेळेत काम करणार आहेत.  केंद्र सरकारच्या नियमावलीनूसार, गर्भवती महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे.

कार्यालयात हजर राहताना कर्मचाऱ्यांनी मास्क लावणं बंधनकारक आहे. शिवाय, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन देखील बंधकारक आहे.

दरम्यान, देशात झपाट्याने कोराना संक्रमण होत आहे. देशात महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार, देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर 123 कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण, ‘हे’ रूग्णालय ठरत आहेत हॉटस्पॉट

“माझ्या नादी लागू नका मी नारायण राणे सारख्या नेत्याला खपवतो, हे तर चिल्लर आहेत”

‘लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 80 टक्के लोकांना..’; पुणेकरांची झोप उडवणारी बातमी समोर

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी ‘हाच’ सर्वोत्तम उपाय, संशोधनातून महत्वाची माहिती समोर

पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना; गुंतवणूक केल्यास करात मिळेल सवलत