पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवला

नवी दिल्ली | देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे.

3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. मात्र पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील कोरोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त सवलती देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा तत्वावर घरे विकून मोकळे व्हा- नितीन गडकरी

-मोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

-‘आम्ही पुन्हा येऊ हा प्रयत्न फसला’; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

-लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…

-जनता हीच राज्य आणि देशाची संपत्ती, ती वाचली पाहिजे- उद्धव ठाकरे