“तुम्ही सेक्युलर असाल तर आंबेडकरांच्या नावाला पाठिंबा द्या”

मुंबई | मुंबई सेंट्रल स्टेशनच्या नामकरणावरून वाद चिघळत चालला आहे. अशातच मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेस सेक्युलर असेल तर आंबेडकरांच्या नावाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. सरकार आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रान मोकळं मिळालं असल्याचं म्हणत आठवलेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर त्यांनी आपल्या गो कोरोनाच्या कवितेवर भाष्य केलं.

आमचा कविता म्हणण्यामागे कोरोना विषाणू देशातून नष्ट व्हावा हाच उद्देश होता. करोनाचे बारा वाजवण्यास आम्ही समर्थ आहोत असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांची एक क्लीप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यात ते गो कोरोना, कोरोना गो असं म्हणत आहेत. त्यांच्या या क्लिपवर सोशल माध्यामातून मोठ्या प्रमाणात मिम्स बनवण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यांवरुन उर्जामंत्र्यांनी केलं ब्राह्मण समाजाला लक्ष्य!

-मोठी बातमी : लवकरच कोरोनावरील औषधाचा शोध लागणार!

-अखेर डोनाल्ड ट्रम्पही पडले नमस्काराच्या प्रेमात!

-तर पुढील आठवड्यात पेट्रोल 70 रूपये लिटर होवू शकत…

-जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; खा. डॉ. अमोल कोल्हेंची संसदेत मागणी