Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘केंद्रातील पथक चौकशीसाठी येतं, पाहणीसाठी नाही’; केंद्रीय पथकाविषयीच फडणवीसांचा मोठा खुलासा!

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील पथकाविषयी मोठा खुलासा केला आहे.

राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्याकरिता केंद्रातील पथक तब्बल दोन महिने उशिरा आलं. यामुळे संपूर्ण राज्यात केंद्रातील पथकाची खिल्ली उडवली गेली. याच मुद्द्यावर बोलताना पुण्यातील शेतकरी संवाद कार्यक्रमात केंद्रातील पथकाविषयी फडणवीसांनी खुलासा केला आहे.

केंद्रातील पथक केवळ चर्चा करण्यासाठी येतं पूर्ण पाहणीसाठी येत नसतं, असा खुलासा फडणवीस यांनी यावेळी केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारकडून निवेदन गेल्यानंतरच केंद्रातील पथक येत असतं. राज्य सरकारचं निवेदनच बऱ्याच उशिरा गेलं होतं. यामुळे केंद्रातील पथक उशिरा आलं.

दरम्यान, 2019ची विधानसभा निवडणुक झाल्यापासून भारतीय जनता पार्टीला राज्यात एकामागून एक धक्के सहन करावे लागत आहेत. 2019च्या निवडणुकीनंतर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत इतर पक्षात प्रवेश केले आहेत. यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

एकनाथ खडसे यांनी देखील काही दिवसांपूर्वी पक्षांतर करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. एकनाथ खडसे यांच्यानंतर खानदेशातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

मात्र, आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच खडसे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या वर्षाच्या शेवट म्हणजे 30 डिसेंबरला खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ईडीच्या नोटीसनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नोटीसवर दुजोरा देत म्हणाले…

“इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं, आता कसं वाटतंय?”

नवीन वर्षात प्रत्येक आठवड्याला वाढणार गॅस सिलिंडरचा दर? वाचा सविस्तर

तुम्हीही सोनं खरेदी करायचा विचार करताय का? वाचा आजचा दर

कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच राजकारण तापलं! ‘या’ बड्या नेत्याने दिला सावधानतेचा ईशारा