छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार??? उद्धव ठाकरे म्हणतात…

नाशिक | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.

भुजबळ कुटुंबियांनी शिवसेनेशी अथवा माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही. छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश होणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नाशिक आणि दिंडोरी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुजबळांचा शिवसेना प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर भुजबळांचा प्रवेश होणार नसल्याचं सांगितलं.

जशी छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली तशी मुंबईतल्या आणि राज्यभरातल्या शिवसैनिकांनी भुजबळांना विरोध करणारे बॅनर झळकवायला सुरूवात केली होती. तुम्ही साहेबांना दिलेला त्रास आम्ही विसरलो नाही, अशा आशयाचे फ्लेक्स मुंबईत लागले होते.

दरम्यान, छगन भुजबळांनी देखील याच आठवड्यात मी राष्ट्रवादी सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट केलं होतं.

उद्धव ठाकरेंनीच भुजबळ शिवसेनेच्या संपर्कात नाहीत, असं स्पष्ट केल्याने राष्ट्रवादी मोठा धक्का बसण्यापासून वाचली आहे. राष्ट्रवादीचा सध्याचा काळ पाहता त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे, असं म्हणावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-इस्रोच्या एकावर एक यशस्वी मोहिमा अन् केंद्र सरकार करतंय शास्त्रज्ञांच्या पगारात कपात!

-धनगर समाजासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

-राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पिचडांना मतदारसंघातील लोकांकडून धक्का!

वेल्हा तालुक्याचा ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची मागणी

-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली???; शिवेंद्रराजे भोसले म्हणतात…