मुंबई | राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी सरस्वती आणि देवी शारदा यांच्या प्रतिमांविषयी एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या (Akhil Bhartiya Mahatma Phule Samata Parishad) कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे. भुजबळ यांनी माफी मागण्याची मागणी त्यांनी केली आहे.
छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि देवींच्या फोटोएवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, असे म्हंटले आहे. यावरुन भाजपने हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा दावा भुजबळांवर केला आहे.
भाषणादरम्यान भुजबळ म्हणाले, शाळांमध्ये फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनीच सर्वांना शिक्षणांचा अधिकार दिला आहे, असे देखील भुजबळ म्हणाले.
शाळांमध्ये सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा फुलेंचा, शाहू महाराजांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
शाळांमंध्ये सरस्वती आणि शारदा देवींचे फोटो लावतात, ज्यांना आम्ही कधी पाहिले नाही. ज्यांनी आम्हाला काही शिकविले नाही. शिकविले असेल, तर फक्त तीन टक्के लोकांना शिकविले आहे, असे देखील भुजबळ म्हणाले.
आम्हाला या देवींनी आणि सरस्वतीने नेहमी दूर ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे फोटो का लावायचे, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. तसेच तुम्हाल जे काही दिले ते या महापुरषांनी दिले, असे भुजबळ उपस्थितांना म्हणाले.
भुजबळ यांच्या भाषणानंतर भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी आक्षेप घेतला आहे. भुजबळांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी राम कदम यांनी मागणी केली आहे. यावेळी त्यांना शिवसेनेला देखील या वादात खेचले आहे.
महत्वाच्या बातम्या –
“2014 ला मला उपमुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण…”; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
नाना पटोले तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर संतापले; म्हणाले, “सावंतांची तत्काळ…”
“…तेव्हा मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला कळेल”; शशी थरुर यांची स्पष्टोक्ती
‘नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका’
‘या’ योजनेत महिन्याला 95 रुपये भरा आणि व्हा लखपती