लॉकडाऊन काळात भुजबळांचं खातं ‘अ‌ॅक्टीव्ह’, अन्न नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम

मुंबई | कोविड- १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्य वाटपात विक्रम नोंदविला आहे. एप्रिल महिन्यात ६८ लाख १३ हजार क्विंटल, मे महिन्यात ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे वाटप, तसेच १ एप्रिल ते ५ जूनपर्यंत ६२ लाख ८४ हजार ४१३ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

सामान्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत महिन्यात साधारणतः ३५ लाख क्विंटल धान्य वितरित केले जाते. मात्र, एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३१ लाख ५१ हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे ६८ लक्ष १३ हजार क्विंटल अन्नधान्य वाटप केले आहे. मे आणि जूनमध्ये केशरी कार्डधारकांना देखील अतिरिक्त १ लाख ५० हजार क्विंटल धान्य वाटप केले जात असल्याने मे महिन्यात ७६ लक्ष ८३ हजार क्विंटल धान्य वितरित करण्यात आले आहे.

कोविड-१९ काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाने राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून योग्य नियोजनाद्वारे राज्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तुरडाळ किंवा चणाडाळ प्रत्येक महिन्याला प्रति कार्ड एक किलो देण्यात येत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केसरी कार्डधारक ३ कोटी ८ लाख लाभार्थ्यांपैकी १ कोटी ५८ लाख (५२ टक्के) नागरिकांनी मे मध्ये ८ लाख १८ हजार क्विंटल धान्य घेतले. यामध्ये प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्यात येत आहे.

कोविड-१९ कालावधीत शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ करण्यात आल्यामुळे राज्यात आता दररोज ८३८ शिवभोजन केंद्रांमधून दीड लाख शिवभोजन थाळींचे वितरण होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार

-केरळच्या हत्तीणीच्या पोस्टमाॅर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आलंय मृत्यूचं कारण?

-“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”

-रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपये मदत तोकडी ठरेल- देवेंद्र फडणवीस

-‘मी तुम्हाला शेवटची ताकीद देतोय’; अरविंद केजरीवाल संतापले