छगन भुजबळांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली, म्हणाले…

पुणे | केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येत्या मार्चमध्ये भाजपचं राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारने दोन वर्षात चांगल काम केलं आहे. मी या कामावर समाधानी आहे. आता राणेंनी मार्चची डेडलाईन दिली आहे. पण त्यांचा मार्च कुठला ते शोधावं लागेल.

पुढचा आणि त्याच्या पुढचा मार्चही जाईल. पाच वर्ष होतील पण महाविकास आघाडी मजबूत राहील. महाविकास आघाडी पुढेही मजबूत राहील, असं छगन भुजबळांनी सांगितलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

1948 साली भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी, असं त्यांनी म्हटलंय.

केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, अशी सूचना भुजबळांनी केली आहे.

विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याबाबत सर्किट हाऊसमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. पुतळा बसवण्याच्या जागेची विद्यापीठ प्रशासनाबरोबर संयुक्त पाहणी केली आहे. त्यानुसार मुख्य इमारतीसमोर पुतळा बसवणे उत्तम ठरणार आहे असे लक्षात आलं आहे, असं ते म्हणाले.

कात्रज येथील परदेशी स्टुडिओमध्ये पुतळा बनवण्याचं काम सुरू असून आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. जयंतीदिनी हा पुतळा बसवण्यात यावा, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं उडवली सरकारची झोप; महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू 

खळबळजनक बातमी समोर; एकाच कॉलेजमधील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची राज्यात दहशत; मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय 

कोरोनानं मृत्यू झालेल्या कुटुंबियांसाठी राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा! 

राकेश झुनझुनवालांना मोठा धक्का; एका आठवड्यात झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान