सहकारमंत्र्यांच्या रॅलीत सोनं आणि पाकीट चोरी करणाऱ्या टोळीला कराडमध्ये अटक

सातारा | राजकीय रॅलीत कार्यकर्ते बनून सोनं आणि पाकीट चोरी करणाऱ्या बीडच्या टोळीला कराड पोलिसांनी गजाआड केलं. या टोळीकडून पोलिसांनी 2 लाख 13 हजार 500 रूपये किमतीचे सोने आणि 4 हजार रूपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या महिन्यात मंत्री बाळासाहेब पाटील यांची कराड शहरात स्वागत रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत या टोळीने गर्दीचा फायदा घेत लोकांच्या गळ्यातील चेन, पाकीट चोरी केली होती. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात अनेत तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी मंत्री पाटील यांच्या स्वागत रॅलीचे काही व्हिडीओ शूटींग पाहिले. त्यावेळी त्यांना तिन्ही आरोपींच्या हालचाली आणि गुन्हा घडलेल्या ठिकाणचे अनेक संशयास्पद फुटेज मिळालं.

दरम्यान, पोलिसांनी हे तिघेही बीड जिल्ह्यातील पेठ बीट पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. यानंतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-राजधानी काबीज करण्यासाठी भाजपची टीम दिल्लीदरबारी

-“… तर मुंबईत फिरणं अशक्य होईल”

-“जीएसटीची भरपाई रक्कम दोन टप्यात सर्व राज्यांना देणार”

-“पवार साहेबांनी सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला”

-केजरीवाल दहशतवादी असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत- प्रकाश जावडेकर