तिकीट मिळण्याआधीच रोहित पवारांची ‘विकेट’???

अहमदनगर | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार विधानसभा निवडणूक लढणार हे आता निश्चित झालं आहे. पण त्यांना ज्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे, त्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना तिकीट मिळण्याआधीच त्यांची विकेट जाणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचं ठरवलंय. मात्र जागा वाटपावरून आघाडीत सुंदोपसुंदी सुरू आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास नकार दिला आहे.

जामखेडची जागा यापू्र्वी काँग्रेसने लढवली होती आणि यंदाच्या विधानसभेलासुद्धा ही जागा काँग्रेसच लढवणार, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी घेतला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील या जागेवर आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या उमेदवारीवर सध्या दुहेरी संकट निर्माण झालं आहे. 

दरम्यान, तिकीट मिळवण्यासाठी रोहित पवार यांना काँग्रेसबरोबर तर संघर्ष करावाच लागणार आहे पण स्वपक्षातील इच्छुकांना सुद्धा शांत करावं लागणार आहे. दोन्ही पातळ्यावर संघर्ष करून रोहित पवार ‘तिकीट’ मिळवणार की ‘विकेट’ गमावणार?, हे पाहणं औत्युक्याचं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-शिवाजीराव आढळराव पाटलांची मस्ती जिरली- अजित पवार

-‘सैराट’सारखं हत्याकांड!!! एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेप

-वर्ल्डकप जिंकल्यानंतर तिने उतरवले कपडे… नेटकरी म्हणतात ही तर इंग्लंडची पूनम पांडे!

-आदित्य म्हणतात, यात्रा पदासाठी नाही; राऊत म्हणतात, सेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या विजयाची सुरूवात!

-राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला वाचवण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला