येत्या 24 तासांत ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

मुंबई | यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पहायला मिळाली. या जिवघेण्या थंडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रच गोठून गेल्याचं पहायला मिळालं.

हिवाळ्यात ऐन थंडीतही अवकाळी पावसाचं आगमन सुरुच होतं. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात अनेक बदल पहायला मिळाले.

अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पहायला मिळालं. शेतातील पिकांचंही मोठं नुकसान झालं. यामुळे शेतकरीही पावसाला हैराण झाल्याचं चित्र होतं.

आता हळूहळू थंडी कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. येत्या चोवीस तासांत दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे काही ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी हवामान खात्याने नागपूरसह, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

पुढील 4 दिवसात वायव्येकडील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता. पुढील 4-5 दिवसांत मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5°C ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं वर्तवलं आहे.

गारपीटमुळे आधीच बागायतदार आणि खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मी वाघाचा मुलगा आहे, नरेंद्र मोदींना सत्तेतून हाकलून देईन”

“चंद्रकांत पाटील मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बोलणं योग्य नाही”

“जेवढं भुंकायचं तेवढं भुंका, करारा जवाब मिलेगा!”

“पवार शिवसेना नेत्यांना योग्य वागणूक देत नाहीत, निधी देताना त्यांच्यात उपकाराची भावना असते”

“पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का? माझी मान शरमेनं झुकली आहे”