पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता

मुंबई | 28 आणि 29 डिसेंबर अशी दोन दिवस शेतकऱ्यांना वेठीस धरल्यानंतर, राज्यातील किमान तापमानात चढ-उतार जाणवला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात ढगाळ हवामानाची (Cloudy weather) स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात बऱ्याच ठिकाणी विरळ प्रमाणात ढग दाटले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून तापमानात किंचित घट झाली असून दिवसभर गारवा जाणवत आहे. राज्यात ढगाळ हवामान असलं तरी, तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळता राज्यात पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत याचा जोर आणखी वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून 4 ते 7 जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे.

याशिवाय येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

3 आणि 4 जानेवारी दरम्यान ओडिशा राज्यात देखील थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात जोरदार पावसासह अनेक ठिकाणी हिमवर्षाव (rainfall with snowfall) होतं आहे. त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातील हवामानात झपाट्याने बदल घडत आहेत.

गेल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसासह गारपीट (heavy rainfall and hailstorm) झाली आहे. अचानक झालेल्या गारपिटीतचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ महिन्यात भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळतील, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ 

“…त्यावेळी मला अनेकांनी वेड्यात काढलं”; द डर्टी पिक्चरबाबत विद्या बालनचा खुलासा 

 “नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”