पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | नव्या वर्षांच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. या पावसाने मुंबई शहरासह उपनगरांमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा देशाच्या उर्वरित भागात परिणाम झाला असून पुढील चार दिवस पावसाचे असतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

IMD ने आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मराठवाडा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

रविवारी मध्य प्रदेश तसेच सोमवार ते बुधवार संपूर्ण विदर्भ आणि छत्तीसगढसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने स्थानिक नागरिकांना हवामान बदलाच्या परिस्थितीबद्दल सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.

रविवार ते मंगळवार, 9-11 जानेवारी या कालावधीत छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या विदर्भ परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येईल. याशिवाय आज पश्चिम मध्य प्रदेश, आज आणि उद्या पूर्व मध्य प्रदेश तसेच सोमवार आणि मंगळवारी छत्तीसगडमध्ये ढगांचा गडगडाट, वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आठवडाभराच्या थंडीनंतर मध्य भारतातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे हवामान दमट राहणार आहे. पुढील चार दिवस गडगडाटी वादळासह पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.

आजपासून म्हणजेच 8-11 जानेवारीदरम्यान मध्य प्रदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच रविवार ते मंगळवार, 9-11 जानेवारी या कालावधीत छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या विदर्भ परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येईल.

याशिवाय आज पश्चिम मध्य प्रदेश, आज आणि उद्या पूर्व मध्य प्रदेश तसेच सोमवार आणि मंगळवारी छत्तीसगडमध्ये ढगांचा गडगडाट, वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

JIO च्या ग्राहकांसाठी खुशखबर; ‘या’ Plan वर मिळतोय जबरदस्त कॅशबॅक 

 “संजय राऊतांना जगावर बोलण्याचा अधिकार, त्यांना सर्व जगाचं कळतंय”

राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधील गुतंवणूक केली कमी! 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात