मुंबई | काही दिवसात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दिवसात राज्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत असंच वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे, असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
राज्यातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा अजूनही निच्चांकी पातळीवर आहे. धुळ्यात 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरु आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचं साम्राज्य आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात ऋतुंचा जांगडगुत्ता झाल्याचं पाहायला मिळत आहेत. गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. यासोबतच सततच्या ढगाळ हवामानामुळे पीकांवर कीड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता अवकाळी पावसाच्या रुपात अस्मानी संकटानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच कंबरडं मोडलं आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदे आदीसह भाजीपाला या पिकांवर आता पुन्हा एकदा अस्मानी संकट गडद होतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याचीही परवानगी देऊन टाका”
“मला सचिन तेंडूलकरची दया येते, त्याकाळी…”, रावडपिंडी एक्सप्रेसचं मोठं वक्तव्य
भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध??? धक्कादायक वृत्त समोर
सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार