पुणे | विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आज देखील पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो, असं सांगण्यात आलंय. उस्मानाबादमध्ये 29, 30 डिसेंबरला पावसाचा अंदाज आहे.
राज्यात मंगळवारी औरंगाबाद, अहमदनगर, वाशिम, अकोला, बुलडाणा,नागपूर, चंद्रपूर, नांदेडमध्ये पावसानं हजेरी लावली.अकोल्यात अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पाउस व गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
या पावसामुळे शहरातील डाबकी रोडवरील नालीचे पाणी रोडवर आल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.तर या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांची तारांमबळ उडाली होती.
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील बटवाडी खुर्द शिवारात वीज पडून एकवीस शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडलीय. त्यामुळे शेळीपालन कर्त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालं.
खामगाव येथील शेळीपालक अशोक पारखे गजानन हटकर आणि साहेबराव हटकर हे नेहमीप्रणे हिवरखेड सह शिराळा शिवारात शेळ्या चारत होते. मात्र, दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि अवकाळी पाऊस सुदधा झालाय.
दरम्यान, राज्यात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे रात्री हलका गारवा जाणवतो आहे. पावसाळी स्थितीत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर
टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली