मुंबई | हवामान विभागानं मुंबईसह (Mumbai) राज्यात काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केलीय. तर मुंबईत 23 मार्चपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलीये.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत 23 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील तापमान वाढत असल्याचं दिसत आहे. बंगालच्या खाडी कडून येणाऱ्या हवे मुळे आर्द्रता वाढल्यानं काही भागात ढगाळ वातावण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, येणाऱ्या पुढील चार दिवस पर्यंत तापमान सामान्य राहील.
विदर्भात मागील 24 तासात तापमानात घट झाली असून , जवळपास 2 डिग्री तापमान खाली आलं असून विदर्भात हिट वेव्हज ची स्थिती हळूहळू संपत आल्यानं हिट वेव्हज इशारा कालच रद्द करण्यात आला होता.
चंद्रपूर सोडता इतर जिल्ह्यात तापमान 40 च्या खाली आलं, त्यामुळे हिट वेव्हज चा इशारा रद्द करण्यात आला.
अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. अकोल्यात तापमान कमी झाल्यानं वातावरणात गारवा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“पंतप्रधानांना 2 तासही झोपू द्यायचं नाही, हे भाजप नेत्यांनी ठरवलंय”
coronavirus update: राज्याला मोठा दिलासा! आज एकही मृत्यू नाही; कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट
काँग्रेसला मोठा झटका?, ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत
दाद्या मारायलाय…! शंकरपाळ्यानंतर आता महाराष्ट्राला वेड लावणारं बारकाल्या पोरांचं भांडण व्हायरल
NCC उमेदवारांसाठी खुशखबर! पोलीस भरतीसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय