मुंबई | अनेक राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. पावसाचा अंदाज असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्याचा समावेश आहे.
हिमाचलमध्ये पुन्हा एकदा पावसासह बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात थंडी कमी झाल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. दरम्यान, विदर्भात आज ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. राज्यात तापामानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. आज विदर्भात हवामान ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राजधानी दिल्लीत सध्या लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आजही दिल्लीत कमाल तापमान 25 आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सकाळी थोडेसे धुके पडण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. परंतू, दिवसाच्या शेवटी हवामान स्वच्छ होईल. पुढील काही दिवस दिल्लीत असंच वातावरण राहणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 27 अंश तर किमान तापमान 12 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर
“सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!
“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…”
Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले