‘या’ 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. उद्या सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस (heavy rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

7 एप्रिल रोजी सुद्धा बुलढाणा, अकोला आणि अमरावतीत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! संजय राऊतांचा सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; स्वगतासाठी बापाने हेलिकॉप्टर मागवला 

आरबीआयचा ‘या’ 3 बँकांना झटका; केली मोठी कारवाई 

कोरोनाचं नवं गंभीर लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका! 

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर दीपाली सय्यद संतापल्या, म्हणाल्या…