पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई | पुढचे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे, असं हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर म्हणालेत.

सध्या ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे तापमानात गारठाही वाढणार आहे. बोचरी थंडी आणि पाऊस असे विचित्र वातावरण या काळात राहणार आहे.

येत्या 3 डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होत आहे. हे वादळ कोलकात्याकडे जाईल. त्यामुळे आपल्या इकडलेही वातावरण निवळेल आणि पुन्हा थंडी वाढेल, असा अंदाज औंधकर यांनी वर्तवला.

नाशिकमध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे आगमन होते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या पावासाने नाशिकरांच्या नाकी नऊ आणले. त्यात गोदावरीला नदीला आलेले चार पूर. मनमाड, नांदगावमध्ये झालेली भीषण अतिवृष्टी.

अगदी दिवाळीतही नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली. आता अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या साऱ्या हवामान बदलामुळे यंदा डिसेंबर सुरू होण्यापूर्वी थंडीचे आगमन झालं आहे. येणाऱ्या काळात पावसाचं वातावरण निवळल्यानंतर थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल! 

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

‘या’ लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अधिक धोका! 

अमृता फडणवीस राजकारणात येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य