मुंबई | 22 आणि 23 जानेवारीला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. दुसरीकडे मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे.
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार राज्यात 22,23 जानेवारीला राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी, हलक्या पावसाची शक्यताही वक्त करण्यात आली आहे.
सकाळी 7 वाजता मुंबई शहर तसेच मुंबई ऊपनगरात तापमान 18 अंशावर होतं. येत्या दोन ते तीन दिवस मुंबईत असंच तापमान राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.
राजधानी नवी दिल्ली सह NCR मध्ये काल मध्यरात्री काही भागात पावसाने हजेरी लावली त्यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर येत्या शुक्रवारी आणि शनिवारीही राजधानी सह परिसरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होत आहे त्याचा परिणाम उत्तर भारतातल्या थंडीवर दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवड्यापासून बेपत्ता डूग्गू कसा सापडला?, वाचा काय घडलं?
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा आहेत?, वाचा कशा बदलाल या नोटा?, जाणून घ्या
लसीमुळे तयार झालेली इम्यूनिटी ‘इतक्या’ महिन्यानंतर संपते; अत्यंत महत्वाची माहिती समोर
दीर्घकाळ दिसतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं; वेळीच घ्या डाॅक्टरांचा सल्ला