आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नजरकैदेत

हैद्राबाद : टीडीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राज्य सरकारने नजरकैदेत ठेवलं असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आंध्र प्रदेशातील वातावरण ढवळून निघालं आहे.

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसविरोधात चंद्राबाबू नायडू करणार असलेल्या आंदोलनामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई केली गेल्याची माहिती आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्यासह त्यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही नजरकैदत ठेवण्यात आलं आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात टीडीपीकडून आत्मकूर इथं मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाची आक्रमता पाहून प्रशासनानं नरसरावपेटा, सत्तनपल्ले, पालनाडू आणि गुरजला जमावबंदी लागू केली आहे.

टीडीपीला मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी राज्यभरात 12 तासांचं उपोषण करण्याचं आवाहन करत राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

राज्याचे डीजीपी गौतम सावंग यांनी मंगळवारी काही भागांत जमावबंदी लागू करण्याची सूचना करत बैठका आणि मोर्चांना परवानगी नाकारली आहे. 

महत्वाच्या बातम्या-