…अन्यथा उद्धव ठाकरेंनी काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवावा- चंद्रकांत पाटील

मुंबई | पुण्यातील टीव्ही9 या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडूरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. रायकरांना वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना आपाला जीव गमवावा लागला आहे. मात्र यावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रात सध्या रोज नवनवीन संकट येत आहेत तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातच बसून आहेत. ठाकरे कधी बाहेर पडणार आहेत?,असा सवाल पाटलांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

उद्धव ठाकरे जर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापुर्तीसाठी मुख्यमंत्री झाले असतील तर त्यांनी इच्छापुर्तीसाठी एक आणि त्यांच्या कामासाठी एक मुख्यमंत्री ठेवावा, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

जम्बो रूग्णालयाकडे लक्ष द्यायला हवं, सगळ्या रूग्णालयांबाहेर एक स्क्रीन लावली पाहिजे म्हणजे स्काईपवर त्यांना आपल्या घरच्यांसोबत आणि नातेवाईकांसोबत बोलायला द्यायला हवं. रोजच्या रोज नातेवाईकांशी बोलणं झालं तर तो पेशंट बरा होईल. सध्या एकदा पेशंट कोविड सेंटरमध्ये गेला तर तो पुर्णपणे बरा होऊन बाहेर येत आहे किंवा तो थेट स्मशानात जात आहे. त्यामुळे एक घर म्हणून सरकार चालवावं, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. अजित पवार यांना त्यांच्या मताचा अधिकार मिळाल्यापासून ते आमदार आहेत. कोणतंही सरकार येऊदे ते मुख्यमंत्री आहेत, मग ते देवेंद्र फडणीवसांसोबत उपमुख्यमंत्रीही असो आत्ता ते उद्धव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री आहेतच. त्यामुळे अजित दादा आपली ताकद कधी वापरणार आहेत?, कारण त्यांची कडक हेडमास्तर म्हणून ख्याती आहे मात्र त्यांनी हे आपल्या कृतीतून दाखवून द्यायला हवं, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पांडूरंग रायकर यांच्या मृ.त्यूमुळे विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

केंद्र सरकारचा पब जी गेमला ‘पट से हेडशॉट’; पब जी गेमसह 118 अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय

“10- 12 वर्षांपु्वी जन्माला आलेले आता राजकारणात चमकायला लागले असून ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत”

‘तुम्ही तुमच्या रक्ताचे नमुने ड्रग टेस्टसाठी द्या’; बॉलिवूडच्या या बड्या कलाकारांना कंगणाने केलं आवाहन

आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील टीव्ही9 चे पत्रकार पांडुरंग रायकर याचं निधन

येणारे 3 महिने धोक्याचे, राज्य सरकारने खबरदारी म्हणून घेतला मोठा निर्णय