मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानं सध्या राज्यातील वातावरण जोरदार तापलं आहे.
सांगलीमध्ये जाहीर सभेत अमोल मिटकरी यांनी हिंदू पुरोहितांची टिंगल केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे.
ब्राम्हण महासंघ आणि भाजपनं अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निषेध व्यक्त केला आहे. मिटकरींनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण महासंघ आणि भाजपकडून केली जात आहे.
अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करून समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टुकडे टुकडे गँगला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवरावं, असं खोचक आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असं लक्ष्य करणं शोभत नाही, असा टोलाही पाटलांनी लगावला आहे.
पुरोगामीत्वाचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात विविध सामाजिक वर्गांतील दुर्बल घटकांना लक्ष्य करून आपली मग्रुरी दाखवायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पद्धत आहेे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यावर नवं संकट! मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
अतरंगी कपडे घालणाऱ्या राखी सावंतवर गुन्हा दाखल; झालं असं की…
“माझं वैयक्तिक कुठलंही बिल नाही, माझी आई आजारी होती तेव्हा…”
“मी माईकवर टॅप करून सांगितलं होतं…”; जयंत पाटलांचा मोठा खुलासा
IPL 2022: चेन्नई-मुंबईमध्ये आज महा’मुकाबला’; रोहितची मुंबई आज भोपळा फोडणार का?