औरंगाबाद | जसा उद्धव ठाकरे यांना भाजपावाल्यांनी धोका दिला, तसाच धोका मला औरंगाबादमध्ये भाजपने दिला, अशी टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
भाजपावाले मातोश्रीवर येत असतील, ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं काम केलं. आम्ही ते सहन करणार नाही, असंही चंद्रकांत खैरे यांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे.
किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होत आहे. यावेळी सभेला संबोधित करताना चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही”
लेडी सचिनचा क्रिकेटला अलविदा; मिताली राजची निवृत्तीची घोषणा
“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”
“पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीसांनी आणि मी खूप प्रयत्न केले पण…”
महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना आता रिझर्व्ह बँकेचा मोठा झटका!