Top news औरंगाबाद महाराष्ट्र राजकारण

“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”

Chandrakant Khaire
Photo Credit: Twitter / @Chandrakant Khaire MP

औरंगाबाद | जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी (Vadgaon Kolhati) ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा विजय झाला आहे. शिंदे गटाला या निवडणुकीत बहुमत मिळाले आहे.

या निवडणुकीच्या निकालावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीतील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेनेचे उमेदवार पळवले, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

या निवडणुकीत त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे वाटून उमेदवार पळवल्याचे आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केले आहेत. आता खैरे यांच्या आरोपाला शिवसेनेचे बंडखोर नेते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे वक्तव्य शिरसाटांनी केले. निवडणुकीत ज्यांचा विजय होतो, तो सर्वांनी नम्रपणे स्वीकारला पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्यांचा पराभव आता मान्य केला पाहिजे, असंही शिरसाट म्हणालेत.

सदर निवडणुकीत जर का आमचा पराभव झाला असता, तर शिंदे गटाला हादरा, शिंदे गटाची पराभवाला सुरुवात, असे सगळेजण म्हणाले असते. आता निवडून आलेले उमेदवार पूर्वीदेखील सदस्य होते, असे शिरसाट म्हणाले.

मी या सर्वांचे नेतृत्व करत होतो. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत 40 हजार मतदार आहेत. या 40 हजार मतदारांनी आम्हाला पसंती दिली. आता शिवसेनेने याचा स्वीकार करावा, असे शिरसाट म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांना मातोश्रीला खूश करायचे आहे. मी किती आणि कसा निष्ठावंत आहे, हे त्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पटवून द्यायचे आहे. त्याचसाठी त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं; शिंदेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

बिग बॉस मराठी 4 होस्ट करण्याबाबत महेश मांजरेकरांचा खुलासा!

मोठी बातमी! संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

“अमित शहांमध्ये मला सरदार वल्लभभाई पटेलांचं प्रतिबिंब दिसतं”