औरंगाबाद | जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात खुर्चीचे मानपान नाट्य पाहायला मिळाले. इम्तियाज जलील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या बाजूला मंत्री आदित्य ठाकरे बसले होते. यावेळी आदित्य ठाकरेंच्या बाजूला इम्तियाज जलील यांना बसण्याची जागा देण्यात आली होती. मात्र, या जागी चंद्रकांत खैर येऊन बसले. त्यामुळे जलील यांना खुर्चीसाठी कसरत करावी लागली.
प्रोटोकॉलनुसार आदित्य ठाकरेंच्या बाजूला जलिल यांना जागा देण्यात आली होती. मात्र, खैरे त्या ठिकाणी बसल्याने खुर्चीचे मानपान नाट्य पाहायला मिळाले. खैरे यांनी मात्र खुर्चीचा वाद झाला नसल्याचं म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरे त्यांना अजूनही तेच खासदार आहेत असे वाटत आहे. पण माझ्यासाठी खुर्ची महत्वाची नसून जिल्ह्याच्या प्रश्न महत्त्वाचे आहेत, अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील मनसे कार्यालय ‘भगवा’मय! – https://t.co/qnv9b4S9Ex @RajThackeray @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला, म्हणून पेढे वाटू नका – देवेंद्र फडणवीस – https://t.co/Oy3nVpdS1D @Dev_Fadnavis @Jayant_R_Patil @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
“हा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा” – https://t.co/Ok2pEy6y2w @OfficeofUT @ShivSena @bjp
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020